शिरुर :अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचा दिवस जवळ येत असून श्रीराम जन्मभूमी न्यासाचा वतीने अयोध्येत  होत असणा-या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका व अक्षता घरोघर वाटपास आज शिरुर शहरात सुरुवात झाली . ताश्याचा व वाद्यांचा गजर करीत मारुतीआळी, सरदारपेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, डंबेनाला, सोनार आळी याभागात प्रभू श्रीराम जन्मभूमी न्यास यांचे कडुन आलेल्या निमंत्रण पत्रिका व अक्षता यांचे घरोघर वाटप करण्यात आले . यावेळी माजी नगरसेवक संदिप गायकवाड , पक्षाच्या शिरुर लोकसभेचा सहसंघटिका अनघा पाठकजी , भाजपाचे माजी शहराध्यक्ष ललित नहार , केशव लोखंडे , भाजपाचे सरचिटणीस विजय नरके , राजू चौंधे , प्रवीण मुथा , समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे विश्वस्त अविनाश जाधव , योगेश महाजन , हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रणव मुसळे , माजी अध्यक्ष राकेश परदेशी , श्यामलाल परदेशी , अशोक काळे , सुरेश दहिवळ , राजेंद्र शहाणे आदी यावेळी उपस्थित होते . हलवाई चौकातील हलवाई गणेश मंदिरात हलवाई गणेशासही अक्षता व निमंत्रपत्रिका ठेवण्यात आली .