मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अत्यंत अडचणींना, संकटांना तोंड देत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केवळ पुढाकारच घेतला नाही तर स्त्रीयांना सुशिक्षित करण्यासोबत त्यांना सत्तेचाही अधिकार मिळवून दिला असे मत मौजे तांबुळगावच्या सरपंच सौ.कल्पना बाबुराव खर्डे यांनी व्यक्त केले.

मौजे तांबुळगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे आज बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी सरपंच सौ. कल्पना खर्डे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक दिगंबर खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे, लक्ष्मण जोरवर, माजी सरपंच माणिकराव उंदरे पाटील, माऊली जोरवर, बाबुराव खर्डे, काशिनाथ आवळे, पांडुरंग निळे, व्यंकटी निळे, शिवाजी नरसिंगराव गडेकर, रामेश्वर खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, स्त्री शिक्षण ही काळाची तेव्हाही गरज होती आणि आजही आहे. परंतू प्रतिकुल परिस्थितीला लढा देवून स्त्री शिक्षणासाठी अनुकूल वातावरण सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणले. स्त्री शिक्षणामुळे महिलांना आपल्या हक्काची जाणिव झाली असून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर असताना दिसून येतात. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फु ले यांनाच असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी तांबुळगाव गावातील महिला, नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.