आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथील पोलीस ठाण्यात पोलीस वर्धापन दिनानिमित्त दिनांक 2 ते 8 जानेवारी दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाण्याचा दिवसभर कारभार कसा चालतो याबाबतची सविस्तर माहिती आष्टी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात येणारे अशी माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली गेल्या दोन दिवसापासून आष्टी पोलीस ठाण्यात हे कार्यक्रम सध्या सुरू आहेत मंगळवारी आष्टीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी या ठाण्याला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे तर आज आष्टी पोलिसांनी जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थिनींना कायदा व सुव्यवस्था बाबत माहिती दिली आहे