बीड (प्रतिनिधी) सध्या पावसाळा चालु असल्याने बीड शहरातील अनेक भागात नाल्याचे पाणी रोडवर आले आहे. तसेच बीड शहरातील पिंपरगव्हाण रोड व परीसरामध्ये सर्वत्र घाणीचे वातावरण झाले आहे. मागील आठवड्यामध्ये व कालच्या झालेल्या जोराच्या पावसामुळे पिंपरगव्हाण रोड वरील दोन्ही नाल्याचे पाणी - कचरा आणी गाळ हा सर्वत्र मुख्य रस्त्यावर पसरलेला आहे.या परीसरात घाणीचे वातावरण तयार झाल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला लागला आहे. याच पिंपरगव्हाण रोड मधील काही गल्ल्यात तर नाल्या पुरेपुर तुंबल्या आहेत तर कुठे कचऱ्याचे ढिगारे नाल्यात तुंबुन वरती आले आहेत. या परीसरात रोडवर आलेले घाण पाणी आणी तुंबलेल्याने लहान मुले व वयोवृद्ध नागरिक जास्त प्रमाणात आजारी पडत आहेत. पिंपरगव्हाण रोड.परीसरासाठी प्रशासणाचा कोणी वाली आहे का वाली..? अशी गंभीर चर्चा सर्वत्र नागरीकांतुन होत आहे.ईथे वाढलेल्या अस्वच्छतेला पाहुन याच परीसरातील एक नागरीक म्हणुन रुग्ण मित्र फांऊडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष बाळासाहेब धुरंधरे यांनी या भागातील नागरीकांच्या निवेदनावर सह्या घेऊन येथील परीसरातील पसरलेली.
अस्वच्छता निवेदनाद्वारे बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना मांडली आहे. तसेच पिंपरगव्हाण रोड लगत दोन्ही नाल्यांची साफ सफाई तात्काळ करुन द्यावी व आठवड्यातून एकदा परीसरात सतत औषध फवारणी करावी, तसेच मुख्य रस्त्यावर खंब्यावरील लाईट चालु कराव्यात अशी मागणी बाळासाहेब धुरंधरे यांनी व भैया वाघमारे यांनी निवेदनाद्वारे बीड नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना केली आहे. परीसरातील नागरीक व रुग्ण मित्र फांऊडेशन चे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.