हिंगणघाट - येथील पत्रकार  प्रदीप उर्फ सोनू आर्य यांची अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी याकरीता  हिंगणघाट पत्रकार संघाचे वतीने पोलीस निरीक्षक मारुती मुलुक यांना निवेदन देण्यात आले.                         
     हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रदीप उर्फ सोनू आर्य यांचे 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या घराजवळून अपहरण करून खंडणीची मागणी करण्यात आली होती. या संदर्भातील तक्रारीवरून  हिंगणघाट पोलिसांनी तिघांना विरुद्ध भादवी 364 अ, 385, 386, 120 ब, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
     या संदर्भात चौकशी करून त्यांच्यावर कठोर  कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा यांना उप विभागीय अधिकारी हिंगणघाट व उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट व ठाणेदार हिंगणघाट यांचे मार्फत पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, प्रा. संदीप रेवतकर, मोहम्मद रफीक, रमेश लोंढे, केवलदार ढाले राजेश कोचर ,मुकेश चौधरी  प्रदीप आर्य ,नईम मालक, रवी येनोरकर,   दीपक सुखवानी, इकबाल पहेलवान, मोहसीन खान प्रमोद जुमडे आदी पत्रकारांनी केली आहे.