भाजप किसान मोर्चा सरचिटणीस पदी तमीजोद्दीन इनामदार
बिडकिन ता. २८ (बातमीदार) :- भारतीय जनता किसान मोर्चा छत्रपती संभाजीनगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा उत्तर जिल्हा सरचिटणीस पदी तमीजोद्दीन इनामदार यांची गुरुवारी (दि.२८) निवड करण्यात आली. किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष बप्पासाहेब शेळके यांनी ही निवड केली.त्यांच्या या निवडीबद्दल केंद्रीय अर्थ व वित्त नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर,भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, कल्याण नाना गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. तमीजोद्दीन इनामदार यांचा चांगला जनसंपर्क असून विविध सामाजिक उपक्रमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अनुभवातून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी भाजप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता किसान मोर्चा ची नविन कार्यकारिणी देशाच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीतील कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते हेच सर्वस्व असून त्यांच्या अविरत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली असल्याचे भाजप च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.