शिरुर - स्वच्छता व पर्यावरण संवर्धन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याकरिता बोरा महाविद्यालयातील ग्रीन क्लब चा वतीने स्वच्छता रॅली काढून स्वच्छतेचा संदर्भात शपथ घेवुन सिध्दीचा पहाडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . बोरा महाविद्यालय हुडको कॉलनी ,सैनिक सोसायटी या परिसरातुन जिजामाता उद्यान अशी ही रॅली गेली रॅलीत ४०० हून आधीक विद्यार्थी सहभागी झाले होते . या रॅलीत व स्वच्छता मोहिमेत शिरुर नगर परिषद वन विभाग शिरुर युनिसेफ, आदी संस्था सहभागी झाल्या होत्या . प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते , शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे , वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप ,एस एस. भूतकर , शुभम निचित प्रतिक कोरडे, मृत्युंजय विचारे, सायली डोंगरवार ,ग्रीनक्लब सदस्य: हाँ. अप्पासाहेब चव्हाण ,डॉ. मंजुषा पाटील,डॉ. सुरेश शिंदे, प्रा. अमोल पितळे, काशिनाथ काळे , ग्रीनक्लब विदयार्थी प्रतिनिधी आर्या आर्या परेश संघवी, आर्या कन्हैया उपाध्याय , प्रथमेश पंडित खेडकर , ,प्रणव बेलोटे ,अभिलेष शुक्ला आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अतुल जेठे, डॉ. अयोध्या शिरसागर "डॉ. दिपक गोरे हे होते .