अत्याचारास कंटाळून युवतीची आत्महत्या. शैलेंद्र खैरमोडे वैजापूर : बहिणी - भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना तालुक्यात मंगळवारी सकाळी उघडकीस आली . एकाने स्वतःच्या चुलत बहिणीवर सातत्याने अत्याचार केल्याने सदरील युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . वैजापूर तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय चुलत भावाने स्वत : च्या १७ वर्षीय चुलत बहिणीवर अनेक महिने अत्याचार केला . त्यामुळे सदर युवती गरोदर राहिली . या युवकाच्या अत्याचारास कंटाळून सदरील युवतीने मंगळवारी सकाळी स्वत : च्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली . या प्रकरणी मयत युवतीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सदर युवकाविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार , बलात्कार व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . त्यानंतर आरोपी युवकास अटक करण्यात आली आहे . पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे हे करीत आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Atishi ने बताए AAP MLA खरीदने की कोशिश करने वाले BJP नेताओं के नाम!
Atishi ने बताए AAP MLA खरीदने की कोशिश करने वाले BJP नेताओं के नाम!
गणेश बाग रोड देवपुरा बूंदी में संदिग्ध गतिविधियो व लडाई झगडे में लिप्त 8 व्यक्ति गिरफ्तार*
जिला पुलिस अधीक्षक बून्दी, राजेन्द्र कुमार मीणा आईपीएस द्वारा जिला बून्दी में अवैध एंव सदिग्ध...
पाटील बुवाच्या खटल्याची सुनावणी 25 नोव्हेंबरला होणार
रत्नागिरी : तालुक्यातील झरेवाडी येथील श्रीकृष्ण अनंत पाटील बुवा यांच्याविरूद्ध दाखल खटल्याची...
Raj Thackeray यांच्या मनसेनं Eknath Shinde यांच्या कारभारावर टीका का केली? | Kalyan Dombivali News
Raj Thackeray यांच्या मनसेनं Eknath Shinde यांच्या कारभारावर टीका का केली? | Kalyan Dombivali News
Amit Shah Speech: मोदी जी जीतकर तीसरा टर्म पूरा करेंगे- Amit Shah | NDA Vs INDIA | PM Modi
Amit Shah Speech: मोदी जी जीतकर तीसरा टर्म पूरा करेंगे- Amit Shah | NDA Vs INDIA | PM Modi