कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
ग्रामपंचायत श्रीक्षेत्र तुळापूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत क्रांतीदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व छत्रपती संभाजी महाराज माध्यमिक विद्यालय श्री क्षेत्र तुळापूर येथील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. तर स्वातंत्र्य सैनिक व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक अनिल सातव यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने प्रभात फेरीचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमास विस्तार अधिकारी श्री. मोरे, सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच राजाराम शिवले, माजी उपसरपंच पवन खैरे, ग्रामपंचायत सदस्या वर्षा शिवले, ग्रामसेवक मिलिंद महाले, चेअरमन रमेश शिवले, प्राचार्य आबा जाधव, मुख्याध्यापक भोसले, अण्णा शिवले, वंदना शिवले व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते