बीड:- आता येणार्या 20 जानेवारी 2024 रोजी ढोलकी , हलगी आणि 10 लाख गाडयांचा ताफ्यासह मनोज जरांगे यांचा आरक्षणासाठी लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे. काहीही झाले तरी आता राजधानी मुंबई गाठायची आणि येतांना आरक्षण घेऊनच यायचे हा ठाम निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. पारंपारिक हलगी, ढोलकी, संबळाच्या नादात जवळपास 10 लाख गाडयांचा ताफा मुंबईत दाखल होनार हे ऐकुन सरकारला घामच फुटला आहे. मुंबई तशी महाराष्ट्राची राजधानी, या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्रालय असुन आजपर्यंत महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने करुनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई ची तुंबई करुन सरकारला आरक्षण देण्यासाठी ही रणणिती मनोज जरांगे यांनी अवलंबली आहे असे बोलले जाते.परंतु या आंदोलनाची तयारी आत्तापासूनच सुरू झाल्याने , शिंदे सरकार अलर्ट मोडवर आलेले दिसत आहे.जरांगे यांना मुंबईत येण्यापासुन रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांची धावपळ सुरु झाली आहे. मनोज जरांगे आपल्या मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्यामुळे . मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षण संदर्भातील सर्व विभागाकडून कसुन माहीती घेणे सुरु केले आहे अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे. जरांगेचा ताफा खरच मुंबईत जर पोहचला तर सरकारच्या आणि यंत्रणांच्या नाकी नऊ येणार हे नक्की. आणि हे सांभाळता सांभाळता खुप मोठी दमछाक होनार आहे. त्यामुळे जरांगेंना विश्वास देऊन , मुंबईत येण्यापासुन रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत.आम्ही जरांगे मुंबईत येण्या आधीच मराठयांना टिकणारे आरक्षण देणार आहोत आणि छगन भुजबळांना आम्ही समज घातली आहे. व त्यांना उगाच एकमेका विरुद्ध बोलु नका आणि दोन समाजात भाडंणे लावण्यापेक्षा समोपचाराने हा पेचप्रसंग सोडण्यासाठी सहकार्य करा असे छगन भुजबळांना सांगीतले आहे , अशी माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे. मनोज जरांगेच्या ठाम निर्णयामुळे शिंदे सरकारने तात्काळ पावले उचलली असुन. एकीकडे मनोज जरांगे यांच्या कडुन आतरंवाली सराटी ते मुंबई लाँग मार्च साठी मार्गाची चापपणी करण्यात आली आहे आणि या ताफ्यात येणार्या गाडयांची नोंद सुध्दा सुरू झाली आहे. अशी माहिती मिळत आहे.