कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

             पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन चे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती येथील विद्यार्थीनींनी राख्या बांधत रक्षाबंधन साजरे केले.

          सेवाधाम मधील सर्व विशेष विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. विशेष विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या प्रेमाने राखी बांधून झाल्यावर सर्व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य भेट देऊन बहिण भावांचा हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी मानसशास्त्रज्ञ नृसिंह कुलकर्णी यांनी रक्षाबंधन विषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंडवे वस्ती चे उपक्रमशील शिक्षक सचिन पवार यांच्या सह सेवाधामचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल, कलाशिक्षक संजय पोटफोडे आदी उपस्थित होते.