a शिरुर - जय जय श्रीरामचा जयघोषात श्रीराम अक्षता मंगल कलश ग्रामप्रदक्षिणा व मिरवणूक शिरुर शहरातून काढण्यात आली . सकल हिंदू समाज शिरुर च्या वतीने शिरुर शहरात या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते . पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा मार्केट यार्ड, शिरूर येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन ही यात्रा शिरुर बसस्थानक, बी. जे कॉर्नर, मारुती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक , कुंभार आळी , आडत बाजार , कापड बाजार मार्गे मिरवणूक रामआळीतील श्रीराम मंदिरात पोहोचली याठिकाणी मिरवणूकीची सांगता झाली . मंगल कलशाचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात आले . मिरवणूकीत मोठ्या संख्येने युवक व महिला सहभागी झाले होते . भगवे झेंडे व भगव्या टोप्या यामुळे सर्व वातावरण भगवेमय झाले होते . त्याच बरोबर ढोल ताशाचा गजर ही यावेळी करण्यात आला .जय श्रीराम व बजरंग बली , भारतमाता की जयचा जयघोष यावेळी करण्यात आला . भाजपचे नेते ॲड धर्मेंद्र खांडरे , जिल्हा बॅकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे , संजय पाचंगे ,भाजपाचे माजी शहराध्यक्ष सपंत लोखंडे , प्रकाश धाडीवाल ,ललित नहार , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार , प्राचार्य समीर ओंकार प्राचार्य विनायक म्हसवडे  ,मनसेचे शहराध्यक्ष ॲड आदित्य मैड , माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे , संदिप कडेकर माजी सरपंच वर्षा काळे,विठ्ठल घावटे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केशव धोंगडे ,सुरेश पाडुळे , नाना पोटे , भाउसाहेब बेंद्रे , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर भाजपा युवा मोर्चाचे उमेश शेळके , माउली साकोरे सह्याद्री प्रतिष्ठानचे कुणाल काळे , अंजिक्य तारु, केशव लोखंडे , विजय नरके , नीलेश नवले , संतोष पटवा , प्रवीण मुथा , प्रमोदमहाराज जोशी ,नारायण देशमाने ,  प्रशांत अवचट ,सुनील चौधरी ,आदी या मिरवणूकीत सहभागी झाले होते .

Sponsored

स्वामी विवेकानंद सीनियर सेकण्डरी स्कूल बूंदी (राजस्थान)

प्रवेश प्रारंभ | लगातार 37 वर्षों से सर्वश्रेष्ठ परिणाम देने वाली ज़िले की अग्रणी संस्था | कक्षा नर्सरी से 12 वीं तक | संकाय : कला, विज्ञान, वाणिज्य, कृषि

श्रीराम मंदिरात  शहरातील कारसेवकांचा सन्मान श्रीराम मंदिरात करण्यात आला सामुहिक आरती नंतर मिरवणूकीची सांगता झाली .