शिरूर - शिरुर येथे  येशू जन्मोत्सव हा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

 येशू जन्मोत्सवाचे आयोजन येशू जन्मोत्सव समिती शिरूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते. या जन्मोत्सवामध्ये प्रथम स्तुती आराधना व मान्यवरांचे गुलाब पुष्प व शाल देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील सर्व पालक संतोष खोतकर, तुषार कांबळे ,संतोष गोरखे, फ्रान्सिस महांकाळे, शिंदे दादा , प्रशांत घोडे , विल्सन भोसले , सुनील बरे ,फुल्सिंग मावळे , सुधीर कोनेसागर , कोमल भगवे , कमल साळवे , तावरे सिस्टर , सपना अमळनेरी,रणखांबे , विश्वास साळवे , इंद्रजित कदम , घोरपडे , प्रवीण कदम.यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील सर्व चर्च लिडरला गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या येशूच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली व येशूच्या वचनाद्वारे बोध करण्यात आला, यावेळी देवाचे दास  पॉल बोलत होते. येशू ख्रिस्त हा जीवन  बदलण्यासाठी आला आहे , येशू ख्रिस्त हा जगामध्ये सर्वांना प्रेम , शांती देण्यासाठी, व त्यांच्या पापातून सोडवण्यासाठी आला हे वचनाद्वारे सांगण्यात आले. यावेळी पॉल दास , आमदार अशोक बापू पवार, नायब  तहसीलदार स्नेहा गिरगोसावी  , पोलीस निरीक्षक संजय जगताप स , लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक, बामसेफ इटक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मगण ससाणे,भाजपा शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक नितीन पाचर्णे, बिजवंत   शिंदे ,माजी नगरसेवक विनोद भालेराव , नगरसेवक मंगेश खांडरे , राष्ट्रवादी काँग्रेस  शहराध्यक्ष मुजफ्फर भाई कुरेशी, हरिभाऊ विर ,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,मनसेचे माजी  शहर अध्यक्ष अविनाश घोगरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरूर तालुका महिला अध्यक्ष संगीता शेवाळे ,हाफिज  बागवान,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष राजुद्दीन  सय्यद, बहुजन पालक संघाचे महाराष्ट्र  संयोजक नाथाभाऊ पाचर्णे ,बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज भाई सय्यद, सागर घोलप, गौरव रावडे ,आशिर्वाद ढगे ,मराठा महासंघाचे योगेश महाजन ,  ,लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष विशाल जोगदंड ,भीमसेवा संघटनेचे शिरूर  अध्यक्ष चेतन साठे ,ॲड .अमोल पठारे, कांग्रेस पक्षाचे नगर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत उजागरे ,प्रमोद गायकवाड, वैभव महाराज जोशी, कांबळे सर  आदी  मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजक शिरूर शहर येशू जन्मोत्सव समितीचे युवराज राजू सोनार ,विपुल राऊत, मधुकर सेनानी,अरुण रणदिवे , अजिंक्य सुर्यवंशी,फ्रान्सिस म्हणकाळे,तुषार कांबळे, संतोष गोरखे बापू रणदिवे, विनोद चोथमल, संजय अमळनेरी , शुभम गायकवाड , शुभम वाकचौरे ,जय गायकवाड, सॅम भगवे , देवीसिंग चव्हाण, देवराम भोसले यांनी केले.