शिरूर दिनांक ( वार्ताहर ) अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई ते पारगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने पादचारास दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला. गणेश बाबूराव इचके वय - ३५ रा. म्हाळोबानगर ,कवठे येमाई , ता . शिरुर , जि पुणे असे मृत्युमुखी पडलेल्यांचे नाव आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल बाबुराव इचके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे . दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी रात्री कवठे येमाई गावचे हद्दीत पारगाव शिंगवे ते कवठे येमाई कडे जाणारे अष्टविनायक हायवे रोडवर म्हाळोबा नगर कडे जाणारे फाट्याजवळ गणेश बाबुराव इचके वय ३५ वर्षे रा. म्हाळोबा नगर कवठे येमाई ता. शिरूर जि. पुणे हे पायी चालत जात असताना त्याना अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात गणेश यास गंभीर दुखापती होवुन ते मरण पावले . अपघाताची खबर न देता वाहनचालक निघून गेला असून अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असुन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर तपास करीत आहेत .