चेअरमन शशिकला परसराम हजारे तर व्हा.चेअरमन महेंद्र गव्हाणे यांची निवड..

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातिल कुतुबखेडा- दादेगांव येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडूक पार पडली होती तर यामध्ये पैठण आमदार तथा शिंदे गाटातील कँबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या लोकशाही शेतकरी विकास पॅनलने तेरा पैकी दहा जागांवर विजय मिळवून सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.मात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया दुय्यम सहाय्यक कार्यालयाच्या निर्वाचन अधिकारी एसगे,गटसचिव सुनिल इंगळे यांच्या अध्यक्षतेखालीपार पडली असून बैठकीत चेअरमनपदी कुतूबखेडा येथील शशिकला परसराम हजारे तर व्हाइस चेअरमन महेंद्र गव्हाणे यांची निवड झालेली आहे.निवडीनंतर नूतन चेअरमन व्हाइस चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार करण्यात आला असुन नवनिर्वाचित संचालक मंडळात आबासाहेब हजारे,शिवाजी हजारे,महेंद्र गव्हाणे, नामदेव गहाळ,काकासाहेब कर्डीले, सुनिल पठाडे, शहाजी झिणे, दिलीप गिरी, अपेक्षा भागवत हजारे, शशिलाबाई परसराम हजारे तर प्रतिस्पर्धी स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे सतिश जगदाळे, संदिप काकडे, कैलास गहाळ, तीन उमेदवार विजयी झाले असे एकुण तेरा आहेत.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती नंदकुमार पठाडे,कुतुबखेड्याचे माजी सरपंच परसराम हजारे, दादेगावच्या सरपंच मनिषा अनिल हजारे,उपसरपंच सुरेश हजारे,महादेव हजारे,सुनिल चितळे, दामोधर काळे, अप्पासाहेब करंगळ,अरुण पठाडे, मोहनराव जाधव, संजय करंगळ,राजीव हजारे,मच्छींद्र पठाडे,प्रमेश्वर ठाणगे,कल्यान हजारे, भाऊसाहेब हजारे, मुरलीधर गहाळ,दिगांबर हजारे, जगन्नाथ आढावउद्धव हजारे, सुरेंद्र गव्हाणे, सुनिल हजारे, प्रल्हाद गहाळ, देविदास हजारे आदींनी अभिनंदन करून सत्कार केला आहे.