उभ्या कंटेनरला कार धडकली; कार मधील तीघेजण जागीच ठार,

धुळे-सोलापूर महामार्गावर उभ्या कंटेनरवर भरधाव कार धडकली; चिमुकलीसह दोघाचा मृत्यू,

ANC जालन्यात जिल्हयात धुळे- सोलापूर महामार्गावरील अंकुशनगर साखर कार खान्याजवळ उभ्या कंटेनरवर भरधाव कार धडकली असून या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून अमोल जाधव, ओंमकार गायकवाड सह चिमुकली माऊली जाधव असे अपघातात जागीच ठार झालेल्याची नावे आहेत.आज दुपारी बक्षाची वाडी येथील हे तरुणं कारने छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात असताना अंकुशनगर सहकारी साखर कारखान्यासमोर एक कंटेनर उभा होता. याचवेळी भरधाव वेगातील कार कंटेनरवर धडकली. यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघात एवढा भीषण होता की कार कंटेनरखाली दबले गेले आहे. मृतांचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. कार बाहेर काढण्याचे काम जेसीबी मशीनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन अपघातग्रस्त कार कंटेनर खालून काढून सर्व जखमींना तात्काळ अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीघांनाही मृत घोषित केले आहे.या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.