शिरुर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय अभ्यासकेंद्रातील एफवाय बीएची विद्यार्थिनी ऋतूजा रवींद्र बनकर हीने १४ व १५ डिसेंबर २०२३ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेत ५ हजार मीटर  रनिंग  मध्ये प्रथम व गोळाफेक मध्ये तीसरा क्रमांक मिळविला .

   या विद्यार्थिनीची नागपूर येथे होणा-या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे . तीच्या या यशाबद्दल शिरुर शिक्षण प्रसारक मंडकाचे सचिव नंदकुमार निकम केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ . के सी मोहिते , केंद्र मार्गदर्शक प्रा चंद्रकांत धापटे ,केंद्र संयोजक डॉ . प्रा .अंबादास केत प्रा सतीश धुमाळ आदीनी अभिनंदन केले आहे . या विद्यार्थिनीस प्रा . डॉ . पी . एस . वीरकर ,क्रीडाशिक्षक डॉ . अप्पा चव्हाण व प्रा योगेश चव्हाण आदीनी मार्गदर्शन  केले आहे .