शिरुर -मोटार सायकल चोरी करणा-या दोघांना शिरूर पोलीसांनी गजाआड करीत चोरीच्या ५ मोटार सायकल ही हस्तगत केल्या आहेत . शिरीष सोपान जाधव वय-१९ वर्षे रा. होलार आळी, शिरुर ता. शिरुर जि. पुणे व संतोष मारुती ढोबळे वय-१९ वर्षे रा. वाडा कॉलनी शिरुर ता.शिरुर जि. पुणे अशी गजाआड केलेल्यांची नावे आहेत . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर पोलीस स्टेशन हददीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेश दिले होते . दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व शिरुर पोलीस स्टेशन यांनी मोबाईल चोरी मध्ये अटक करण्यात आलेले आरोपी १) शिरीष सोपान जाधव वय-१९ वर्षे रा. होलार आळी, शिरुर ता. शिरुर जि. पुणे २) संतोष मारुती ढोबळे वय-१९ वर्षे रा. वाडा कॉलणी, शिरुर ता.शिरुर जि. पुणे यांच्या कडे मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्यांनी रांजणगाव एम.आय.डी.सी, पारनेर याभागातुन चार हिंरो होन्डा कंपनीच्या स्प्लेंडर मोटार सायकल व होंडा कंपनीची एक शाईन मोटार सायकल अशा एकुण पाच मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले असून दोन्ही आरोपींचे ताब्यातुन एकुण पाच मोटार सायकल १,८०,०००/- रु किंमतीच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत . तसेच दोन स्प्लेंडर मोटार सायकलचे इंजिन नंबर व चॅसी नंबर खोडण्यात आले आहेत. यासंदर्भातील आधिक तपास शिरुर पोलीस करीत आहेत . ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल . अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घटटे , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवलदार सांगळे, पोलीस नाईक नाथासाहेब जगताप, पो.शि. रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, यांच्या पथकाने केली .