शिरुर :ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल मध्ये इनक्रेडिबल इंडिया या उपक्रमांतर्गत देशातील विविध प्रांताची संस्कृती , खाद्य परंपरा , वेशभूषा , त्या प्रांतातील महनीय व्यक्तिमत्व , नृत्य , ऐतिहासिक , धार्मिक स्थळे यासर्वांचे दर्शन एकाच छताखाली विद्यार्थी व नागरिकांना पाहता आली .

 शिरूर येथील ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल येथे मध्ये एका छताखाली भारत दर्शनाचे आयोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे ,उपाध्यक्ष दीपक घावटे ,सेक्रेटरी सविता घावटे, संचालक प्रा .सुधीर शिंदे ,संचालिका अमृता घावटे, सीईओ डॉ . नितीन घावटे, डॉ.अखिलेश राजूरकर ,डॉ. विवेक महाजन , मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे (मराठा सेवा संघ अध्यक्ष) , शशिकला काळे ,सुवर्णा सोनवणे ,लता नाझीरकर, प्रशांत जाधव, सुनील मुसमाडे, गणेश देशमुख, प्राचार्य. रूपाली जाधव , प्राचार्य संतोष येवले , मुख्याध्यापिका.सुनंदा लंघे , हे उपस्थित होते. डॉ राजेराम घावटे म्हणाले की विविधेत एकता ही आपली ताकद आहे भारतातील विविध प्रांताची संस्कृती ,लोककला व प्रांताची ओळख विद्यार्थ्यान मध्ये व्हावी या हेतून व बंधुता व एकात्मता वाढीस लावण्याचा दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा आहे . यावेळी विविध राज्यातील लोककला , संगीत , नृत्य विद्यार्थ्यानी सादर करत उपस्थितांची मने जिंकली . कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल मधील शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या मेहनतीने पार पडले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रुपाली जाधव यांनी सूत्रसंचालन अनाप मॅडम यांनी तर आभार डॉ . नितीन घावटे यांनी मानले .