शिरुर -  शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती साठी स्वतंत्र भारत पक्षा शिवाय पर्याय नाही असे स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले . स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा पुणे जिल्हा दौरा शिरुर तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळेव महागणपती मंदिर सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या, आंदोलनाची तयारी व पक्ष बांधणीवर चर्चा करण्यात आली . घनवट म्हणाले देशात व राज्यात राजकारणाची पातळी ढासळली आहे . सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडणे व गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे पुणे जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती व शेतमालाचे भाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले आहेत, कोणत्याही पक्षाची शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही, शेतकऱ्यांचे व देशाचे दारिद्र्य हटविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष हा एकच पर्याय आहे असे ते म्हणाले . शरद जोशींनी स्थापन केलेला स्वतंत्र भारत पक्ष बळकट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे , पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अनिल चव्हाण आदीनी ही मार्गदर्शन केले . बैठकीत संपूर्ण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, सुरळीत वीजपुरवठा व कर्जमुक्ती साठी जानेवारी महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला . या बैठकीत स्वतंत्र भारत पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदावर सुहास नामदेव काटे यांची नियुक्ती करण्यात आली .या बैठकीस शेतकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण रांजणे माजी जिल्हाध्यक्ष शरद गद्रे, शिवाजी खेडकर तुषार कुटे दिलीप भोरडे प्रकाश बढे राजेंद्र धुमाळ महेश गजेंद्रगडकर अमोल पाचुंदकर,डॉ.दिपक गायकवाड , जयश्रीताई घनवट , नितीन थोरात, नितीन देडगे, सदाअण्णा नलवडे, दत्ता फडतरे, शंकर फडके, आनंदा गायकवाड, निलेश शिंदे,किरण थोरात, अजिंक्य रावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .