शिरुर - शासकिय सेवेतील आधिकारी व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आरोग्य खात्यातील कर्मचारी संपावर गेले असून या संपात ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र शिरुर व न्हावरा येथील कर्मचारी ही सहभागी झाले असल्याची माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन पुणेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप लंगडे यांनी दिली . जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करवी अशी आग्रही मागणी लंगडे यांनी केली असून शासनाने याबाबतचा निर्णय तात्काळ घ्यावा असेही ते म्हणाले .