शिरुर -माजी आमदार बाबूराव दौंडकर स्मारक समिती रांजणगाव गणपती येथील नवीन संकुलाचे उदघाटन व वेबसाईट चे लोकार्पण गुरुवार दि . २१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य व्ही .भागय्याजी यांचा हस्ते होणार असून यावेळी उच्च आणि तांत्रिक शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघसंचालक नानासाहेब जाधव उपस्थित राहणार असल्याचे माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड . धर्मेंद्र खांडरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . या पत्रकार परिषदेस स्मारक समितीचे उपाध्यक्ष धनंजय गायकवाड , कोषाध्यक्ष सागर फराटे , विठ्ठल वाघ , नानासाहेब लांडे आदी यावेळी उपस्थित होते . खांडरे म्हणाले की शिरुर तालुक्यास सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न स्वर्गिय आमदार बाबूराव दौंडकर यांनी केला .७२ दुष्काळी तालुक्याची दुष्काळ परीषद आयोजन करण्यात त्यांच्या पुढाकार होता तसेच जनतेचा प्रश्न धसास लावण्यासाठी त्यानी सातत्याने प्रयत्न केले . त्याच्या कार्याचे स्मरण व्हावे व सर्वाना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे स्मारक रांजणगाव येथे उभारले गेले . स्मारक समिती मागील २५ वर्ष ग्राम व कृषि विकासाचे कार्य करीत आहे . या स्मारक समितीची एक एकराची जमिन रांजणगाव येथे असून स्थानिक शेतक-यांसाठी हक्कांचे सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र याठिकाणी व्हावे या दृष्टीने स्मारक समिती काम करते . शेतक-यांसाठी पाणी माती परीक्षण केंद्र , शेतीविषयक मार्गदर्शक कार्यक्रम ,मेळावे ,मार्गदर्शन , परिसंवाद ,प्रयोग प्रात्यक्षिके , कृषी ग्रंथालय , प्रशिक्षण हॉल ,गोवंश संवर्धन , आरोग्य विषयक मार्गदर्शन , कुटुंब सल्ला मार्गदर्शन केंद्र ,स्वयंरोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण ,सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र , आजारी जनावरांच्या उपचारासाठी फिरते वाहन , आदी उपक्रम स्मारक समितीचा मार्फत केले जातात . असे ही खांडरे यांनी सांगितले .