शिरूर -बनावट चलनी नोटा तयार करणा-यास बनावट नोटा व साहित्यासह रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे .मनिष अमर पाल वय २४ रा, रेवाना ,जि.घाटमपूर उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून त्याला २३ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यानी दिली आहे. बनावट नोटा रॅकेटचे धागेदोरे दिल्ली पर्यत असण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने पुढील तपास करित आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8.00 चे सुमारास कारेगाव येथील यशईन चौक येथे एक इमस ॲक्टीवा स्कुटी मोटार सायकल क्र.एम एच . ३४ सीई - ११३४ वरुन भारतीय बनावटीच्या बनावट चलनी नोटा घेवुन येणार असल्याची माहिती पो.कॉ. विजय शिंदे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत मिळाली होती. सदरची बातमी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना सांगीतल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, उमेश कुतवळ . विजय शिंदे यांचे पथक कारेगावचे येथील यशईन चौकातील यझाकी कंपनीजवळ सापाळा लावुन थांबले. त्यानंतर ९ च्या सुमरास एक इसम ॲक्टीवा स्कुटी मोटार सायकल वरुन एमआयडीसी मधील अंतर्गत रोडने जाताना दिसला. त्यावेळी सापाळा लावुन थांबुन राहिलेल्या पोलीसांनी त्यांचेकडील खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडून त्याला त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मनिष अमर पाल वय 24 वर्षे, रा. रेवाना, जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500/रु. दराच्या 60 नोटा अशा एकुण 30,000/रु, च्या बनावट चलनी नोटा मिळुन आल्या. सदरच्या नोटांपैकी बहुतांश नोटांवरती एकच नंबर असल्याने सदरच्या नोटा या बनावट असल्याची पोलीसांची खात्री झाल्याने त्या जप्त करण्यात आल्या. सदरच्या नोटा कोठुन आणल्या याबाबत विचारणा केली असता त्याने या नोटा शिरुर येथील शिरुर रामलिंग रोड येथील तो राहण्यास असलेल्या फ्लॅटमध्ये स्वतःच तयार केलेल्या असल्याचे सांगीतले. त्यामुळे पोलीस मनिष अमर पाल यास घेवुन तो राहण्यास असलेल्या शिरुर, रामलिंग रोड येथील खोलीमध्ये गेले असता त्या ठिकाणी भारतीय बनावटीच्या बनावट चलनी नोटा तयार करण्यासाठीचे साहित्य त्यामध्ये नोटा तयार करण्यासाठीचे पांढरे कागद, कलर प्रिंटर स्कॅनर, हिरव्या रंगाची पावडर, छाप्याची लाकडी फ्रेम, वेगवेगळ्या रंगाचे कलर स्प्रे. इत्यादी साहित्य मिळून आले .. या प्रकरणी मनिष अमर पाल वय 24 वर्षे, रा. रेवाना, जि. घाटमपुर, उत्तरप्रदेश याच्याविरुध्द गुन्हा रजि.नं. 893/23 भा.द.वि.क. 489 (अ), (क), (3), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला २३ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर गुन्ह्यातील बनावट नोटांचे रॅकेटचे धागेदोरे हे दिल्ली पर्यंत असण्याची शक्यता असुन पोलीस त्याबाबत पुढील अधिक तपास करत आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्‌या मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठीचे साहित्य मिळून आले असल्याने सदर गुन्ह्याचा सखोल तपास करणे बाबतच्या सुचना पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल . अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण सहाय्यक .पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक . शिवाजी मुंढे, सहाय्यक. फौजदार . दत्तात्रय शिंदे, पो. कॉ. उमेश कुतवळ, विजय शिंदे, पो. हवा. विलास आंबेकर, संतोष औटी, अभिमान कोळेकर यांनी केली . गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शिवाजी मुंढे, करीत आहेत.