शिरुर - शासनाने कांदा बंदी त्वरीत उठवावी तसेच अवकाळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सरसकट त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिरुर तालुका शेतकरी सेनेच्या वतीने शासनाकडे निवेदना दवारे करण्यात आली आहे . शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठीचे निवेदन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले. यावेळी शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेशभाऊ ओव्हाळ पाटील,शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार,तालुका सल्लागार संतोष काळे,ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख सुनिल चौधरी,उपतालुकाप्रमुख राहुल शिंदे,विभागप्रमुख अनिल सातकर,प्रविण धावडे, आदी उपस्थित होते. योगेश ओव्हाळ यांनी सांगितले की शिरुर तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये नैराश्य आले आहे,शेतात माल पिकला तर भाव मिळत नाही,भाव मिळाला तर निर्यात बंदी होते,गेली अनेक दिवस शेतकरी आपला टोमॅटो,रस्त्यावर,बांधावर फेकत आहे,कांद्याला भाव नसल्याने तो शेतक -यानी चाळीत साठवला,थोडा भाव वाढला तर सरकारने लगेच कांदा निर्यात बंदी केली,शेतीपुरक दुधधंदा पुर्णपणे कोलमडला आहे,शेतीवर अवलंबून असलेलं वर्षभराचं बजेट तोट्यात आलं आहे,सध्या तालुक्याच्या काही भागामध्ये अवकाळी पाऊस व गारपीठ झाली त्यामध्ये द्राक्ष,कांदा रोपे,केळी,टाॅमॅटो,भाजीपाला व फळबागांचे आतोनात नुकसान झाले,त्याचे सरसकट पंचनामे झाले नाहीत,पिकविमा कंपन्या शेतकर्‍यांची थट्टा करत आहे अजून सर्व शेतकर्‍यांना पीकविमा मिळाला नाही,शेतीवर आधारीत असणारे बॅकेचे कर्ज थकलेत,विजबिल भरु शकत नाहीत,शेतीला बी,बियाणे खते औषधे घेण्यास लागणारे आर्थिक भांडवल संपलय,मुलांचा शैक्षणीक खर्च थांबलाय,आरोग्यासाठी खर्च करण्यास पैसे नाही,या सर्व समस्या शेतकर्‍यांसमोर उभ्या ठाकल्यात असे ते म्हणाले . शासनाकडे निवेदनादवारे पुढील मागण्या केल्या आहेत. कांदा निर्यात बंदी त्वरीत उठवावी ,दुधाला १ लिटरला १० रुपये अनूदान द्यावे ,सर्व शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माप करावे ,सरसकट वीज बील माफ करावे , पीकविमा त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा ,अवकाळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सरसकट त्वरीत पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत .