शालेय शिक्षणासह सर्वांना आर्थिक साक्षरतेचे ज्ञान दिले गेले पाहिजे- शाखा व्यवस्थापक योगेश काळे

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाचोड (विजय चिडे) व्यंकटेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोड खुर्द ता.पैठण येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आर्थिक साक्षरता शिबीर पाचोडच्या व्यंकटेश मल्टिस्टेट शाखेत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी बोलताना शाखा व्यवस्थापक योगेश काळे म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासह आर्थिक साक्षरतेचे ज्ञानदेखील दिले गेले पाहिजे,या शिबिरात पहीली ते चौथीपर्यंत शाळेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बँक शाखाधिकारी योगेश काळे यांनी बँकिंग व्यवहाराबाबत माहिती देताना बँकेचे कामकाजात बँक मध्ये काय सुविधा दिल्या जातात, शाखा व्यवस्थापकाचे काय काम असतं ,कॅशिअर, क्लार्क ,यांचे काम कसे चालते , भरणा स्लीप , गोल्ड लोन, विड्राल स्लीप, खाते उघडण्याचा फॉर्म, पिग्मी, एटीएम, चेकबुक, मुदत ठेव योजना बुक, तिजोरी, लॉकर हे सर्व प्रत्यक्ष दाखवून विविध योजना, बँक व्यवस्थापन आदींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी बँकेच्या होम सेव्हिंग्जमध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी आपापली खाती उघडण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तर, मुख्याध्यापक उपेंद्र शिंदे यांनीही विद्यार्थी वर्गाला बँकिंग व्यवहाराबाबत मार्गदर्शन केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेतील केंद्रीय मुख्याध्यापक घोडके, वर्गशिक्षक केतन विरकर,शाखा व्यवस्थापक योगेश काळेसह शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.