देवानं दिलं आणि कर्मानं नेलं,

मुरमा येथील महिला सरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवलं, सरपंच पद गमावलं,

छत्रपती संभाजीनगर,विजय चिडे,

 छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील ग्रामपंचायतीचे सदस्या सिंधुबाई शिंदे यांच्यापतीने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय रद्द केले असल्याने देवानं दिलं आणि कर्मानं नेलं अन् शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवलं अन् सरपंच पद गमावलं असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.सिंधुबाई शिंदे यांचे पती दादासाहेब शिंदे यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यामध्ये पक्कं घर बाधून राहत असल्याची तक्रार मुरमा ग्रामपंचायत सदस्य गोपीचंद आहेर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत च्या सरपंच सिंधूबाई दादासाहेब शिंदे यांच्या पतीने गावातील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ५० बाय५० मध्ये अतिक्रमण करून त्यामध्ये राहत आहे. सरपंच व त्यांच्या पतीने शासकीय जमिनीवर मागील काही वर्षांपूर्वी अतिक्रमण करून त्यात आवारभिंत, पक्कं बांधकाम, घरबांध कामसुद्धा केले आहे. त्यामुळे शासकीय जागेवर अतिक्रमण करणे म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली असल्याचा आरोप गोपीचंद आहेर यांच्याकडून जिल्हाधिकारयाकडे केल्या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून सिंधुबाई शिंदे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.