शिरुर - येथील सामाजिक कार्यकर्ते व शिरुर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल मारुती बांडे यांनी  भारतरत्न डॉ. .बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती शिरूर, एचडीएफसी बॅक शिरुर  यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात म६२वे रक्तदान केले.

यावेळी  शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  संजय जगताप  माजी नगरसेवक विनोद भालेराव, नगरसेविका  ॲड .मायाताई गायकवाड, डॉ. मगन ससाणे, शिरूर नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी राहुल पिसाळ , रमेश गायकवाड , प्रमोद गायकवाड, कैलास गायकवाड, लक्ष फाऊंडेशन संचलित न्यु अर्पन व्हाॅलंटरी रक्त केंद्र, अहमदनगर चे चेअरमन सुलक्षण शिंदे  यांच्या उपस्थितीत बांडे यांचा प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला .बांडे हे मागील काही वर्षापासून नियमित रक्तदान करीत आहेत .