शिरूर : मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान येथील विधानसभेतील यशाबद्दल येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी लाडू वाटप करून व फटाके फोडून आनंद साजरा केला. विधानसभा निवडणुकीत भाजपा या तीन राज्यात सत्तेत येत असल्याचे वृत्त समजल्यानंतर शिरूर नगरपालिका मंगल कार्यालया समोर शहरातील भाजपा कार्यकर्ते एकत्रित झाले. ढोल वाजवून फटाके फोडून व एकमेकांना लाडू भरवून कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करीत लाडू वाटप केले. ‘भारत माता कि जय ‘, देश का नेता कैसा हो पंतप्रधान नरेंद्र मोदी जैसा हो’ अश्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या सरचिटणीस रेश्मा शेख,भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विनोद भालेराव, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू शेख, माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, सरचिटणीस विजय नरके, शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात,आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष नीलेश जाधव, मितेश गादिया,राजू शहाणे,नीलेश नवले,प्रमोद जोशी, अजित डोंगरे, नवनाथ जाधव, आदी यावेळी उपस्थित होते. फोटो ओळी तीन राज्यातील भाजपाच्या विजयाबद्दल शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी लाडू वाटून व फटाके फोडून आनंद साजरा केला.