शिरुर -  शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच शारिरीक क्षमता व कौशल्याचा विकास गरजेचा असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार तथा विभागीय संचालक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे विभागचे डॉ . विश्वासराव गायकवाड यांनी केले . मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुरच्या मैदानावर आयोजित करण्यात आले होते त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम होते . विद्यापीठाचे निरीक्षक दिलिप भंडारे , प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ . के .सी .मोहिते , अभ्यास केंद्राचे मार्गदर्शक प्रा चंद्रकांत धापटे , कक्षाधिकारी संतोष वामन , केंद्रसंयोजक डॉ अंबादास केत , आदी यावेळी उपस्थित होते . गायकवाड म्हणाले की शरीर सक्षम बलवान असेल तरच मानसिक स्वास्थ व सदृढता प्राप्त होते त्यासाठी अश्या क्रिडास्पर्धांची आवश्यकता असते . अध्यक्षीय मनोगतात निकम म्हणाले की पारंपारिक विद्यापीठाप्रमाणे मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासकरिता विद्यापीठाने हाती घेतलेल्या क्रिडा महोत्सवाचा उपक्रम अत्यंत स्त्युत्य आहे . डॉ. मोहिते यांनी स्वागतपर मनोगतात महाविद्यालयातील व अभ्यासकेंद्रा वरील उपक्रमांचा आढावा घेतला तसेच विद्यापीठाने स्पर्धा आयोजन करण्याबद्दल दिलेल्या संधी बद्दल मुक्त विद्यापीठाचे आभार मानले . प्रस्ताविक केंद्र संयोजक डॉ अंबादास केत यांनी केले तर सूत्र संचालन प्रा डॉ क्रांती पैठणकर यांनी केले आभार केंद्राचे मार्गदर्शक प्रा . चंद्रकांत धापटे यांनी मानले . या स्पर्धेसाठी पुणे ,सोलापूर ,सातारा या तीन जिल्हायातून १२५ हून आधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला .१९ क्रीडा प्रकारच्या स्पर्धा यावेळी झाल्या याठिकाणी निवड झालेल्या सांघिक व वैयक्तिक पातळीवरील विजेत्याची नाशिक येथे होणा-या विद्यापीठस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली . फोटो ओळी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन करताना शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम