शिरुर - शिरुर ग्रामीण ( रामलिंग ) ग्रामपंचायतीचा उपसरपंचपदी बाबाजी ( अण्णा ) सुखदेव वर्पे यांची बिनविरोध निवड झाली आहे . काही दिवसापूर्वी रामलिंग ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यात माजी सरपंच अरुण घावटे व बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे यांच्या नेतृत्वाखालील रामलिंग देव्हडेश्वर पॅनेलची सत्ता ग्रामपंचायतीत आली .

वर्पे यांनी यापूर्वी ही उपसरपंच म्हणून काम पाहिलेले असून लोकप्रिय व सर्व समावेशक युवक नेतृत्त्व म्हणुन त्यांची परिसरात ओळख असुन व्यवसायिक म्हणून ही ते प्रसिध्द आहेत . वार्ड क्रमांक ४ मधुन वर्पे हे निवडून आले आहेत   

यावेळी सरपंच शिल्पा दिलिप गायकवाड यांनी सरपंचपदाची सूत्रे स्वीकारली . बाजार समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल ,जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , जिल्हा परिषद माजी सदस्य बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , माजी नगराध्यक्ष जाकिरखान पठाण , मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे , लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक ,  शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार , मनसुखलाल गुगळे ,माजी नगरसेवक नितीन पाचर्णे , विठ्ठल पवार , संदिप गायकवाड , बाजार समितीचे माजी सदस्य संतोष मोरे , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार ,माजी उपसरपंच भरत बो-हाडे ,,माजी सरपंच वर्षा काळे ,शिरुर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सर्जेराव दसगुडे , मेजर नामदेव घावटे , सरपंच संतोष लंघे , माजी सरपंच नामदेवराव जाधव , माजी सरपंच नितीन बो-हाडे , अमोल वर्पे , रवींद्र सानप , शिरुर मुद्रण संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव पाचंगे , व्यवसायिक संदिप वर्पे , माजी सरपंच सोमनाथ घावटे , नितीन नवले शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड .प्रदीप बारवकर, संतोष शितोळे ,माजी पंचायत समिती सदस्य दादापाटील घावटे , आबासाहेब सरोदे , शिवसेनेचे रामभाउ देवकर , व्यवसायिक राजेंद्र लांडे , सचिन कातोरे ,किरण घावटे ,विनोद पोटघन , अनिल बांडे , नीलेश दिवटे , ज्ञानेश्वर रासकर , आप्पासाहेब वर्पे , आदी उपस्थित होते . मंगलदास बांदल यांनी ग्रामपंचायतची सुसज्ज इमारत उभी करावी अशी सूचना केली .  शिरुर ग्रामपंचायतीचे महसुली उत्पन्न वाढीचा दृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगितले .

     माजी सभापती शशिकांत दसगुडे म्हणाले की गावाला एक कुटुंब म्हणून पुढे नेण्याचे काम नवनिर्वाचित ग्रामपंचायत समिती सदस्यांनी करावे . 

सर्वाना  बरोबर घेवून विकासकामे मार्गी लावणार असल्याचे सरपंच शिल्पा गायकवाड व उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी सांगितले . यावेळी उपस्थितांचे स्वागत अमोल वर्पे यांनी तर प्रास्ताविक माजी उपसरपंच भरत बो-हाडे , सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले .आभार उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी मानले .