शिरुर -इनामगावच्या तत्काळीन सरपंच पल्लवी संजय घाडगे यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत कारवाई करावी अशी मागणी विरोधकानी केली होती .यासंदर्भात नूकतीच विभागीय आयुक्तानी त्यांची चौकशी करुन घाडगे यांचेकडुन सरपंचपदाचे विहित कर्तव्यपालनात कसूर, हेळसांड अगर गैरवर्तन झाल्याचे निर्वीवादपणे सिध्द होत नाही त्यामुळे घाडगे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) कारवाईची आवश्यकता नसल्याचा आदेश विभागीय आयुक्तानी दिला असल्याची माहिती पल्लवी संजय घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली .          शिरुर येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी , शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे , माजी चेअरमन तात्यासाहेब घाडगे , उपसरपंच सूरज मचाले , माजी उपसरपंच तुकाराम मचाले , संजय घाडगे , प्रवीण घाडगे , सिध्देश्वर म्हस्के ,परशुराम मचाले आदी उपस्थित होते . पल्लवी घाडगे यांनी सांगितले की सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणावर विकासकामांना सुरुवात केली होती . अश्यावेळी विश्वासात घेत नाहीत असे सांगून चुकीचे आरोप करीत विकासकामे थांबविण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. त्यातूनच तत्काळीन उपसरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांनी शिरूर पंचायत समिती येथे उपोषण करून माझ्या विरोधात तक्रार करीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ प्रमाणे कारवाई करुन चौकशीची मागणी केली होती. शासनाने या संदर्भात चौकशीसाठी गटविकासअधिकारी यांची चौकशी समिती नेमली चौकशी समितीला आरोपात काही तथ्य आढळून आले नाही त्यांनी माझ्या बाजूने अहवाल दिला. त्यानंतर जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी(सिवो) यांचाकडुनही चौकशी झाली या चौकशी तुन ही काही आढळून आले नाही. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत ही आरोप सिद्ध झाले नसल्याची माहिती घाडगे यांनी दिली. पल्लवी घाडगे म्हणाल्या की विकासकामे करताना त्यात कोणतेही राजकारण आणले जावू नये. राजकीय हेतू ठेवून चुकीचे आरोप करू नका.यातुन विकास कामात अडथळे निर्माण होतात सरपंचपदी काम करताना नेहमीच लोकहिताचे व विकास कामांनाच आपण प्राधान्य दिले असल्याचे घाडगे यांनी सांगितले.