जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत पाणी सतत तापत ठेवा- शिवशाहीर अरविंद घोगरे पाटील

"हर्षी येथे मराठा आरक्षणासह हम सब जरांगे यावर शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी सादर केला पोवाडा"

पाचोड (विजय चिडे) मंनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी हर्षी ता.पैठण येथे सोमवारी (दि.२०) मराठा आरक्षणावरती शिवशाहीर अरविंद घोगरे पाटील यांचे पोवाड्याचे मराठा समाजाकडूंन आयोजित करण्यात होते. मागील दोन महिन्यांपासून आतापर्यंत मराठा आरक्षणा वरचा शिवशाहीर अरविंद घोगरे पाटील यांनी५९ वा पोवाडाचा कार्यक्रम पार पडला. यावेळीशिवशाहीर अरविंद घोगरे पाटील यांनी पोवड्यातून असे म्हटले की,जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत पाणी सतत तापत ठेवा आरक्षण भेटली गोड भात करून आनंद साजरा करा.

या ओव्यामध्ये शिवशाहीर अरविंद घोगरे यांनीहम सब जरांगे...,मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातूनच मिळावे...,समाजाला आरक्षण नाही तर मतदानही नाही...,आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे... एक मराठा- लाख मराठा..., तसेच मंनोज जरांगे पाटील यांच्यावरती पोवाडा सादर केला आहे.हर्षी इथे संपन्न होत असल्याने पोवड्यातून छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, शरद पवार, गोपीचंद पडळकर,विजय वडेट्टीवार यांच्यावरती ही निशाणा साधला, त्यामुळे हर्षीत जय जिजाऊ जय शिवराय... तुमचं आमचं नातं काय...छत्रपती शिवाजी महाराज की जय... एक मराठा कोटी मराठा यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, त्यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमासाठी लहान बालकांसह वृद्ध, महीला यांनीही हजरी मोठ्या संख्येने उपस्थित होती, शिवशाहीर अरविंद घोगरे पाटील यांच्या या पोवड्यासाठी हर्षी येथे दादेगाव, सोनवाडी ,दावरवाडी, इनायपूर, खादगाव,नांदर,कौदर, थेरगाव सह परिसरातील नागरिकांनी मोठि गर्दी केली होती. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दि. 24 डिसेंबरचा अल्टीमेट दिल्यानंतर आता ते महाराष्ट्रभर तिसऱ्या टप्यात दौरा सुरू केला असून दि.15 नोव्हेंबरपासून याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची ज्योत सतत भेटती ठेवायचे आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मराठा आरक्षणावरती सभा व पोवाडे आयोजित केले जात आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत असल्याचे पहावयास मिळत आहे.