शिरुर दिनांक ( वार्ताहर ) रमेश संभाजी जासुद रा .चव्हाणवाडी यांचे कारेगाव येथील शेतातील विहिरीत सात ते आठ महिने वयाच्या बालकाच्या मृतदेह आढळून आला .या अज्ञात बालकाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. .अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार वैजनाथ रामराव नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे . 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी कारेगाव गावचे हद्दीत पुणे ते अहमदनगर हायवे रोडलगत रमेश संभाजी जासुद रा. चव्हाणवाडी, करडे रोड यांचे मालकीचे शेतातील सिमेंटचा कठडा असलेल्या विहिरीत अनोळखी सहा ते आठ महिन्याच्या बालकाचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन बालकाचा नाकावर कशाने तरी मारुन फॅक्चर केले व त्याचा गळा दाबुन खुन केला आणि पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने बालकास विहिरीतील पाण्यात टाकुन दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . याप्रकरणी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोकडे करीत आहे .