शिरुर -शिरुर ग्रामीण ( रामलिंग) सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दोन जण निवडणुक रिंगणात असल्याने सरपंचपदा करीता एकास एक लढत झाली सरपंचपद अनूसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी होते .अनिता राजेंद्र गवारे व शिल्पा दिलिप गायकवाड यांच्यातील थेट लढतीत शिल्पा दिलिप गायकवाड विजयी झाल्या. गायकवाड यांना 2446 मते मिळाली. शिल्पा गायकवाड या माजी नगरसेवक संदिप गायकवाड यांच्या पुतणी आहेत . प्रमुख विजयी उमेदवारामध्ये माजी उपसरपंच बाबाजी वर्पे व संजय शिंदे यांचा समावेश आहे प्रमुख पराभूतामध्ये तुषार दसगुडे , रमेश दसगुडे यांचा समावेश आहे . विजयी उमेदवार - गणेश दसगुडे, मंदा दसगुडे, स्वाती बो-हाडे , बाबाजी वर्पे , संजय शिंदे, शंकर गायकवाड वा मोनिका जाधव तर यापूर्वीचं खालील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.लता चंद्रकांत इसवे , यशोदा शिवाजी दसगुडे , लिला नामदेव दौंडकर , यशवंत देवराम कर्डिले , छाया काळूराम जाधव ,स्वाती विठ्ठल घावटे , सचिन भाउसाहेब घावटे , सोनाली विजय घावटे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली .