शिरूर: दिवाळी निमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे बाल दीपोत्सव-2 उपक्रम पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ माई यांच्या श्री मनशांती छात्रालय, शिरूर येथे राबविण्यात आला. 

 संस्थेतील 80 अनाथ, निराधार मुलांना दिवाळी फराळ, फटाके, मोती साबण, उटणे, सुगंधी तेल, अगरबत्ती, बिस्किट व चॉकलेट देण्यात आले तसेच ज्यूट ची टिफीन बॅग ही दिली, संस्थेतील कर्मचाऱ्यांना फराळ, दिवे तेल, रांगोळी अंगरबत्ती अश्या वस्तू भेट देण्यात आल्या तसेच मूलांना क्रिकेट चे साहित्य देऊन मुलांनी व सर्व फाउंडेशनच्या सदस्यांनी क्रिकेट चा आनंद घेतला. असा आगळावेगगळा बाल दीपोत्सव - 2 उपक्रम राजाभाऊ गुडदे फाउंडेशन च्या वतीने श्री मनशांती छात्रालयात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आशा मालुसरे या उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम अगवने  यांनी केले. माईंचे मानसपुत्र विनय सपकाळ यांनी छात्रालया विषयी माहिती देउन किरण गुडदे व त्यांच्या फाउंडेशनचे माई परिवाराच्या वतीने आभार व्यक्त केले. बाल दीपोत्सव -2.0 ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण संगीत गुडदे,  संगीत गुडदे, अनिमेश गुडदे, धंनजय गवारे, दर्शना गवारे, गोरल गवारे, मनोज जोशी, गिरजा जोशी, मृणाल जोशी, मनोज माने, पंकज बोरोले, निधी बोरोले, अमोल बगडिया या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले असून या दीपोत्सवात छात्रालयातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.