शिरुर :  येथील सिताबाई थिटे फार्मसी कॉलेजला आविष्कार २०२३ स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले आहे . तुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती येथे पार पडलेल्या 'आविष्कार' झोनल रिसर्च स्पर्धेमध्ये सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर च्या सानिका काकडे व गायत्री काकडे यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. जिल्ह्यातून २०० पेक्षा जास्त संशोधन प्रस्ताव आलेले असताना त्यातून सिताबाई थिटे कॉलेज विद्यार्थीनींनी पहिले पारितोषिक मिळवून दिले. या संशोधनात शरीरात होणा-या रक्ताच्या गाठी वितळवण्यासाठी औषध बनवण्यात आले होते. ज्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना घेता येईल व उपचार योग्य आणि कमी खर्चामध्ये होतील हा संशोधनाचा मुळ हेतू होता. संशोधनासाठी मार्गदर्शक प्रा . मोनाली परभणे यांनी केले . छत्रपती संभाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक प्रा. मोनाली परभणे यांचे अभिनंदन केले.