शिरूर - राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा पार्श्वभूमीवर शिरूर बसस्थानकातून आज एक ही एस.टी बस रस्त्यांवर आली नाही. दररोज साधारणपणे १९० हून अधिक बस फे-या बसस्थानकातून होतात व सुमारे साडेचार लाख रुपयेचे उत्पन्न मिळते. राज्यात मराठा आरक्षण मागणीवरून मोठ मोठी शहरे व ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये आंदोलन होत आहे. या आंदोलनाचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा भाग म्हणून शिरूर बसस्थानकातून एक ही बस आज रस्त्यांवर आली नसल्याचे आगार व्यवस्थापक भैरवनाथ दळवी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की काल दुपार पासूनच बससेवा वाहतूक तुरळक स्वरूपात सुरु होती. सध्या शिरूर बसस्थानकातून दररोज १९० बस फे-या विविध मार्गावर होतात व त्यापासून साडेचार लाख रुपयेचे उत्पन्न मिळते. आज दिनांक १ नोव्हेंबर रोजी एक ही बस रस्त्यावर आली नाही. आज बसस्थानकात पारनेर व श्रीगोंदा या दोन स्थानकातुन शटल बस शिरुर बसस्थानकात आल्या शिरुर बसस्थानक मार्गे ५०० हून आधिक एस टी बसेस मराठवाडा व विदर्भा कडे जा ये करीत असतात काल दुपार पासून या मार्गावरील बस वाहतुक बंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले . आंदोलनाची तीव्रता कमी झाल्यावर बससेवा नेहमीप्रमाणे सुरु होईल असे त्यांनी सांगितले . चौकट शिरुर मधुन रोजगार ,व्यवसाय व शिक्षणाचा निमित्ताने दररोज प्रवास करणा-यांची संख्या मोठी आहे . एस टी बससेवा बंद असल्याचा फटका चाकरमनी व दररोज कामानिमित्त व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणा - याना व शिक्षणासाठी परगावी जाणा-यांना बसला .अनेकांना मिळेल त्या खाजगी वाहनाने कामाचे ठिकाण गाठावे लागले .त्याच प्रमाणे ज्यांना परगावी जायचे होते त्यानाही खाजगी वाहतूकीचा आधार घ्यावा लागला काहीना प्रवासा साठी नेहमीचा पैसा पेक्षा आधिकचे पैसे प्रवाश्या साठी मोजावे लागले .