शिरुर  :शिरुर शहरातुन मराठा समाजाच्य्या आरक्षणाच्या मागणीसाठी ऐतिहासिक असा कॅडल मार्च काढण्यात आला .

  या मार्च मध्ये युवकांची व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती .शहरात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने नागरिक कॅडल मार्च साठी रस्त्यावर उतरल्याने शहरातील हा ऐतिहासिक कॅडल मार्च ठरला . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हा मार्च सुरु झाला . शांततामय व शिस्तीत छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाउ मॉ साहेब यांचा जयघोष करीत व ' आरक्षण आमच्या हक्काचे ' हा नारा देत हा कॅडल मार्च पुणे नगर रस्त्याने शिरुर तहसिल कार्यालयाकडे गेल्या . कॅडल मार्च मध्ये सहभागी झालेल्यानी भगव्या टोप्या घातलेल्या होत्या . कॅडल मार्च मध्ये अग्रभागी महिला व त्यापाठोपाठ युवक व नंतर नागरीक होते . कॅडल मार्च मध्ये ७५ वर्षीय ज्येष्ठ्य महिला पुष्पा मुकुंदराव आंबेकर या लक्ष वेधून घेत होत्या . भगवी टोपी घालून त्या कॅडल मार्च सुरु झालेला बाजार समिती पासून तहसिल कार्यालयापर्यत पायी चालत आल्या . त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की सरकारने कुणबी व मराठा असा फरक न करता सरसकट आरक्षण दिले पाहीजे .आमच्या मुला मुलींच्या व पुढच्या पिढीच्या शिक्षण व रोजगारासाठी आरक्षण मिळणे गरजेचे आहे . मनोज जरांगे पाटील यांच्या रुपाने समाजाला प्रामाणिक नेतृत्व मिळाले असून त्याच्या आरक्षणाचा लढा नक्की यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने आरक्षण लढयात सहभागी व्हावे असे आवाहन करत आपण आपली नात आदिती आढाव व मुलगा अभिजीत सह कॅड्ल मार्च मध्ये सहभागी झाले असल्याचे सांगितले . मार्च मध्ये अनेक जण कुटुंबातील सदस्यांसही सहभागी होते . या कॅडल मार्च मध्ये मराठा समाजा व्यतिरिक्त अन्य समाजाचे बांधव ही मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून त्यांनी ही मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.    मार्च मध्ये विद्यार्थी व तरुणाईची संख्या ही लक्षवेधी ठरली . शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक कॅडल मार्च मध्ये सहभागी झाल्याने हा ऐतिहासिक कॅडल मार्च झाला .