वराडी घेऊन जाणाऱ्या लक्झरीचा अपघात,१२ जणं किरकोळ जखमी,

पाचोड

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी फाट्या येथे छत्रपती संभाजीनगरवरून बीडच्या दिशेने लग्नासाठी वराडी घेऊन जाणाऱ्या लक्झरीला पाठीमागून एका कंटेनरने जोरदार धडक दिल्याने यात जवळपास 10 ते 12 वराडी हे जखमी झाले आहेत.या अपघातातील जखमींना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.