आठरा वर्षीय युवकांची गळफास घेऊन आत्महत्या,

"पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथील घटना"

पाचोड विजय चिडे/ 

पैठण तालुक्यातील पारुंडी तांडा येथे एका अठरा वर्षीय युवकांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.२५)रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली असून निखिल मांगीलाल राठोड असे आत्महत्या करणाऱ्या युवकांच नाव आहे.निखिल राठोड याच्या आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत समजु शकले नाही.

याविषयी सूत्रांकडुन भेटलेल्या माहीतीनुसार, निखिल राठोड व त्यांचे आई वडील हे मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवत आहोत.त्यांना एक ते दिड एकर शेती असून त्या शेतात सध्या कपाशी आहे. मात्र एकार शेतात संसार चालवणे कठीण होतं असल्याने त्याचे आई वडील हे मोलमजुरी करत होते‌. त्यांना ही थोडाफार हातभार लावला म्हणून निखिलही हाताला भेटलं ते काम करत होता.मात्र बुधवारी (दि.२५)रोजी सकाळी निखिल हा घरातुन बाहेर गेला‌.थोड्यावेळांने त्यांचे नातेवाईक शेताकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांनी निखिलने एका लिंबाच्या झाडाखाली गळफास गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील सरपंच आकाश राठोड यांना दिली असता त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दिली असता बीट जमादार प्रशांत नांदवे यांनी तातडीने घटनास्थळी पोहचुन निखिल याचा मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने खाली उतरून त्यास आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले असता कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.घुले यांनी त्यास तपासुन मृत्यू घोषीत केले. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रशांत नांदवे करीत आहेत.