शिरुर : संभाजीनगर ( हुडको कॉलनी )येथील राष्ट्रवादी कॉग्रेस युवक चे ( अजित पवार ) शहाराध्यक्ष सागर अशोक पांढरकामे वय ३५ यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली .आज सागर पांढरकामे याचे निधन पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान  झाले .

सागर पांढरकामे यांचा काही दिवसापूर्वी  गंभीर असा अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला व मेंदुला गंभीर इजा झाली होती. .सागर हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे  पदाधिकारी व छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळ हुडको कॉलनीचे  सक्रिय कार्यकर्ता होते  . मागील काही दिवसापासुन उपचारा दरम्यान त्याच्या  प्रकृतीत चढउतार होत होते. आज उपचारा दरम्यान सागर याची प्राणज्योत मालवली. .सागर यांची अकस्मित एक्झिट अनेकाना चटका लावून गेली .अंत्ययात्रा रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सकाळी नउ वाजता हुडको कॉलनी येथील राहत्या घरापासून अमरधाम स्मशानभूमी शिरुर येथे जाईल .