शिरुर दिनांक ( वार्ताहर ) ज्याच्या स्वभाव चांगला असतो त्यांचे भविष्य उज्जवल असते असे प्रतिपदन  डॉ. ज्ञानप्रभाजी महाराज यांच्या शिष्या  जैन धर्मगुरु नियमदर्शनाश्री  महाराज यांनी केले . येथील विद्याधाम प्रशाले मधील व्याख्यानात ते बोलत होते .यावेळी प्रियलश्रीजी महाराज , पोलीस निरीक्षक संजय जगताप शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे धरमचंद फुलफगर , शिरीष बरमेचा ,प्रकाश बाफना ,  शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती नीलेश खाबिया , ॲक्टिव्ह सोशल गृपच्या अध्यक्षा कामिनी बाफना ,मुख्याध्यापक प्रकाश कल्याणकर आदी यावेळी उपस्थित होते . स्वंत : आपण बेस्ट असल्याचे मनावर बिंबवा ज्यांचे नेचर चांगले त्याचे प्युचर चांगले असते . स्वंत : आनंदी राहा व इतरानाही आनंदी करा . दुसराना दु :ख देवून आनंद घ्यायचा नसतो .आनंद हा दुसराना देण्यात असतो . आपण जे काही ठरवू ते आपण करु शकतो ही जिद्द मना मध्ये असली पाहीजे .अडचणी प्रश्न निर्माण झाल्यावर रडु नका या प्रश्नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा . सातत्याने प्रयत्न करा आळस करु नका मी माझे ध्येय स्वप्न साकार करणारच ही खुणगाठ मनाशी बांधा .प्रत्येकात गुण असतात तुमच्यातील सुप्तावस्थेतील गुण बाहेर आले पाहीजे. चांगले संस्कारी बनण्यासाठी चांगल्या सवयी लावा . आई वडिला विषयी आदर ठेवा त्यांची फसवणूक करु नका . जागतिक तापमान वाढी मुळे उ पर्यावरणा संदर्भात प्रश्न निर्माण झाले असुन पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करावेत. मोठ्या प्रमाणावर झाडे लावावेत .इतरांची सेवा व मदत करा. असे ही त्या म्हणाल्या .