शिरुर दिनांक ( वार्ताहर ) परिस्थितीनेच मला घडविले .आयुष्यातील दु :ख व वेदना यांना प्रेरणा बनवित विशेष मुलांसाठी आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुलची स्थापना केली असे या संस्थेच्या संस्थापिका राणीताई चौरे यांनी सांगितले . येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात विद्यार्थिनी मंच व महिला लैंगिक अत्याचार निवारण समिती यांच्या वतीने ‘ सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा ‘ ही विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे . आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी आकांक्षा व समीक्षा या आपल्या दोन विशेष मुलींच्या प्रेरणेतून विशेष बालकांमधील सुप्त गुणांना विकसित करून त्यांना समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संधी निर्माण केली पाहिजे या तळमळीतून राणीताईंनी आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूलची स्थापना केली.नाते शब्दांपलीकडचे या संस्थेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे 30 विशेष बालकांचा सांभाळ व संगोपन ते करतात . अनंत अडचणींवर, आयुष्यात अनाहूतपणे उभ्या टाकलेल्या असंख्य प्रश्नांवर मात करत आज केवळ दोन नाही तर 30 विशेष बालकांची माता होत, आपल्या कार्याच्या द्वारे एक नवा आदर्श राणीताईंनी सर्वांसमोर उभा केला. फिरुनी नवी जन्मेन मी, असे म्हणत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या विशेष मुलांच्या मातेने केलेला हा संघर्षमय प्रवास त्यांच्याच शब्दांत त्यांनी व्याख्यातुन उलगडून दाखविला . त्या म्हणाल्या की माझे प्रशासकिय आधिकारी बनण्याचे स्वप्न होते . परंतु माझ्या मुलीनमुळे मी शिक्षीका बनले. विशेष मुले मुलींच्या पालकांच्या वेदना व्यथा काय असतात हे त्यांनी सांगितले .जीवन निस्वार्थी व सुंदर निरागसपणे कसे जगावे हे माझ्या मुली समीक्षा व आकांक्षाने शिकविले. विशेष मुलांच्या आईने सन्मानाने जगता यावे याकरिता त्याना आधार देण्याचे काम फाउंडैशन ने केले .मला जगण्याचे बळ विशेष मुलांनी दिले .ताण तणाव अडचणीना घाबरु नका त्याला खचु न जाता त्याना सामोरे जा .नव्याने आयुष्य जगायला शिका मनुष्य जन्म एकदाच मिळाला आहे तो चांगलापणे आनंदाने जगा .समाज काय म्हणतो याकडे लक्ष न देता स्वीकारलेले काम प्रामाणिकपणे करत राहा . समाजाचे आपण देणे लागतो हा विचार सातत्याने लक्षात ठेवा . यावेळी प्राचार्य डॉ . के .सी मोहिते प्रा.एस. एस. जाधव ,महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. पल्लवी ताठे ,विद्यार्थी मंचचा समन्वयक प्रा डॉ क्रांती पैठणकर ( गोसावी) मराठी साहित्य परिषद शाखा शिरुरचे अध्यक्ष नीलेश खाबिया , प्रवीण गायकवाड , आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक विद्यार्थिनी मंचच्या समन्वयक प्रा. डॉ. क्रांती पैठणकर(गोसावी) यांनी केले. प्रा. निर्मला संकपाळ  यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा.रवीना साकोरे  यांनी मानले.

फोटो ओळी -

सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा ‘ या व्याख्यानमालेत बोलताना राणी चौरे