शिरुर - वडनेरच्या  निचित परिवाराची सलग सातवी पिढी  पोलीस पाटील पदावर विराजमान झाली आहे .  सौ.स्नेहल विशाल निचित  यांची  वडनेरच्या पोलीस पोलीस पाटील पदी निवड झाली आहे .

ही निचित परीवाराची पोलीस पाटीलपदी निवड झालेली सातवी पिढी आहे .यापुर्वी या परिवारातील  १)रावजी पाटील, २)तुकाराम पाटील, ३)नाना पाटील, ४)कृष्णा पाटील, ५)दत्तात्रय पाटील,६) नारायण पाटील, आणि आता ७)स्नेहल पाटील या पोलीस पाटील झाल्या आहेत .स्नेहल निचित  यांची निवड परीक्षेतून  झाली. ८० पैकी ७४ गुण त्यांना मिळाले असुन त्यांनी   बी . ई कॉम्प्युटर  पर्यंत शिक्षण घेतले असून  उच्च विद्या विभूषित पोलीस पाटील स्नेहलच्या रुपाने वडनेर ग्रामस्थांना लाभला आहे . या पदाला न्याय देण्याचे व  सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविणे  व पोलीस बांधवांना योग्य सहकार्य करुन गुन्हेगारी व बेकायदेशीर कामाविरोधात मदत करणार असल्याचे त्यांनी निवडी नंतर सांगितले .

 त्यांच्या या निवडीबद्दल सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे साहेब, जिल्हा परिषदेच्या माजी. सभापती सुनीता गावडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, भिमाशंकर कारखान्याचे माजी. चेअरमन देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, शिरुर तालुका देखरेख संघाचे चेअरमन बाबाजी निचित, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र  गावडे, शिरुर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सदस्या अरुणा घोडे,सरपंच दामुआण्णा घोडे,सरपंच नवनाथ निचित व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .