शिरुर -

सुपा , ता . पारनेर येथील दिवटे पाटील पब्लिक स्कूल मध्ये माजी राष्ट्रपती डाॅ . ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . माजी राष्ट्रपती डाॅ .ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती व वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त स्कुलच्या विद्यार्थ्यानी *"मी डाॅ . ए. पी. जे. अब्दुल कलाम बोलतोय" व"वृत्तपत्र वाचन काळाची गरज" या विषयांवर संस्कृत, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत मनोगत व्यक्त केले. यावेळी वृत्तपत्र वितरण करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला व वृत्तपत्राचे सामुहिक वाचन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सुरेखा दिवटे यांनी दिली .