पावसाचे पाणी रस्त्यासह शेतात सोडून शेतीसह मालाची हानी!
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील प्रकारशेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला स्वातंत्र्यदिनी | आत्मदहनाचा इशारा..
औरंगाबाद प्रतिनिधी: डोंगरउतारावरून पाणी वळवून तसेच पावसाचे पाणी वहिवाटीच्या रस्त्यावर सोडून ३० एकर शेतीतील शेतीमालाचे नुकसान होत आहे. कन्नड तालुक्यातील करंजखेड येथीला (जा.) काही ग्रामस्थांनी खोडसाळपणाने हे कृत्य करून छळणाऱ्यांविरोधात सरकार दरबारी अर्जविनंत्या करूनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा चौघा आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, मौजे करंजखेडा शिवारात गट नंबर ७८, ११८ आणि १०५४ मध्ये तब्बल ३० एकर शेतजमीन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शासन दरबारी अर्ज विनंत्या करणे सुरू आहे. काही ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाला मॅनेज करून आपल्या बाजूने निकाल लावून घेतला आहे. मुळात काही ग्रामस्थांनी करंजखेडा शिवारातील डोंगरातील व पावसाचे पाणी वाहून जाण्याची जुन्या नैसर्गिक ठिकाणी वहिवाट करून वाहणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण केला आहे.
खोडसाळपणे डोंगरातील व पावसाच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी, पाणी निकासाच्या नैसर्गिक मार्गातील अडथळे दूर करून आमचे नुकसान टाळावे आदी मागण्या शेतकऱ्यांनी अन्याय केल्या आहेत. आम्हाला न्याय न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्हदहर करण्याचा स्पष्ट इशारा सदाशिव दगडू दूर करा वनारसे, दत्तू पंढरीनाथ वनारसे, रतन भावलाल ताटू आणि कारभारी धोंडीबा सुरासे या शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती कन्नड तहसीलदार, कन्नड उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, सिटीचौक ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी आदींना सादर केल्या आहेत.
जीवितास धोका!
हे पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये तसेच काही शेतकऱ्यांच्या घरांत घुसून शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. प्रसंगी शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करून, शेतकऱ्यांना गाव सोडून पळवून लावण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दरवर्षी आम्हाला हा त्रास असून, पिकांसह शेतजमिनीचेही नुकसान होत आहे. २०२१-२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने ३० एकर जमिनीतील शेतीमालाची अपरिमीत हानी झाली. वारंवार अर्ज निवेदने देवूनही तालुका आणि जिल्हा प्रशासन बेफिकीर आहे.