शिरूर दिनांक (वार्ताहर ) टपालदिनानिमित्त शिरूर डाक कार्यालयातील अधिकारी व पोस्टमन यांच्या विशेष सन्मान मातोश्री प्रतिष्ठान व शिरूर शहर मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने करण्यात आला. सर्वत्र साजरा होत असणा-या टपाल दिनानिमित्त शिरूर डाककार्यालयातील पोस्टमास्टर अमोल साळवे, पोस्टमन भालचंद्र गायकैवारी, शंकर साळुंखे, भानुदास टेमगिरे, शांतीलाल सावंत,विकास आनंद यांचा शाल व गुलाबपुष्प व पेन देवून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित आंबेकर, स्वामी समर्थ सेवा मंडळ शिरूरचे गणेश घाटगे, व मराठी साहित्य परिषद शाखा शिरूरचे उपाध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नितीन बारवकर म्हणाले की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, मनातल्या आठवणी, भावभावना पोहोचविण्याचे महत्वाचे माध्यम टपाल आहे . आजच्या जगातही दूरगावी नाती जोडणारा दुवा म्हणून टपालकडं पाहिलं जातं. आजच्या डिजिटल जमान्यातही टपालखात्यानं आपलेपणाचा आनंद जोपासला आहे तो दिलासादायक आहे. संदेशांची देवाणघेवाण करण्याची सर्वात जुनी, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा म्हणून टपाल कडे पाहिलं जात असे सांगुन आंतराष्ट्रीय टपालदिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या . प्रा. सतीश धुमाळ यांनी बदलत्या काळानुसार पोस्ट सेवेत झालेले बदल व सर्वसामान्याच्या आयुष्यात असलेले पोस्ट सेवेचे मह्त्त्व विशद करून आजच्या काळात ही पोस्ट सेवेचे असलेले महत्व याबाबत भाष्य केले.पोस्ट सेवेविषयी कृतज्ञता म्हणून पोस्टमन व पोस्टमास्टर यांच्या सन्मान करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी बोलताना पोस्टमास्टर अमोल साळवे म्हणाले की पोस्ट सेवे विषयी आदर, स्नेहभाव व कृतज्ञता म्हणून टपाल दिना निमित्त करण्यात आलेल्या सन्मान आम्हाला काम करण्यासाठी अधिक उर्जा देणारा आहे. डाक विभागाच्या ज्येष्ठ नागरिकांपासून विद्यार्थ्या पर्यत असणा-या व समाजातील विविध घटका संदर्भातील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वागत व आभार प्रदर्शन अभिजित आंबेकर यांनी केले . फोटो ओळी – टपाल दिनानिमित शिरूर डाक कार्यालयातील आधिकारी व पोस्टमन यांच्या सन्मान करण्यात आला.