शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहरातील खिदमत फाउंडैशन आरोग्य जनजागृती संदर्भात चांगले काम करीत असल्याचे गौरवोद्गगार प्रसिध्द उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी काढले . हजरत मोहम्मद पैंगबर जयंती निमित्त खिदमत फाउंडैशन शिरुरच्या वतेने विनामूल्य महा आरोग्य शिबीर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचे आयोजन शिरुर नगरपरिषद मंगल कार्यालयात करण्यात आले होते . या शिबीराचे उदघाटन प्रसिध्द उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , माजी नगराध्यक्ष नसीम खान , रवींद्र ढोबळे ,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान शहिदखान पठाण ,डॉ .आकाश सोमवंशी , डॉ . परवेझ बागवान , माजी नगरसेवक विनोद भालेराव , नामदेव घावटे , माजी नगरसेवक सुकुमार बोरा ,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक ,इक्कबालभाई सौदागर , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार , शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील जाधव , संघपती भरत चोरडिया , वात्सल्य सिंधु फाउंडैशनच्या सचिव उषा वाखारे , जैन परिषदेचे प्रकाश बाफना , सचिन कातोरे , माजी सभापती नीलेश खाबिया , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , मुन्ना शेख , डॉ . आखिलेश राजूरकर ,एकनाथ शेलार , डॉ राठौड , आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना धारीवाल म्हणाले की मागील काही वर्षापासुन खिदमत फाउंडैशन सेवाभावी वृत्तीने विविध उपक्रम राबवित आहे त्याच बरोबर आरोग्य शिबीराचे आयोजन करुन आरोग्य क्षेत्रात ही काम करीत आहे. शिरुर शहर हे भाईचारा ,सलोख्या व एकात्मता जोपासणारे शहर आहे . राहुल पाचर्णे म्हणाले की सामाजिक बांधिलकी जोपासत खिदमत फाउंडैशन काम करत आहे . जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी ही शिबीरास भेट दिली . शिबीरात विनामूल्य आरोग्य तपासणी, आजाराविषयी मोफत सल्ला, ई. सी. जी . ब्लड परेश, शुगर चेकअप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व मोफत चष्मे वाटप आदी करण्यात आले. शिबिराचे आयोजन खिदमत फाउडेशन शिरूरचे अध्यक्ष हाजी असिफ हाजी हमीद शेख, उपाध्यक्ष मुस्ताक हाजी उस्मान शेख, मुख्याध्यापक फारूक सांगलीकर, हाजी फिरोज बागवान, आबिद उर्फ मुन्ना आबिद शेख, आरिफ सय्यद आदींनी केले होते. यावेळी सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी तर आभार मुन्ना शेख यांनी मानले .

 फोटो ओळी-

 हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शिरूर येथे खिदमत फाउंडेशनच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.