शिरूर दिनांक (वार्ताहर) येथील डंबेनाला गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने गणेशोत्त्सव निमित्ताने समाजसेविका पद्मश्री कै.डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या पुणे नगर रस्त्यावरील बबनराव मोरे नगर येथील मनशांती छात्रालय शिरूर येथील विद्यार्थ्याना भोजन व किराणामालाच्या वस्तू देण्यात आल्या. डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक शिरूर यांनी लोकसह्भागातून सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून मनशांती छात्रालयातील सुमारे ८० विद्यार्थी व अन्य ५० असे १३० हून अधिक जणांकरीता भोजन दिले. त्याच बरोबर ३५ लिटर गोडेतेल, साखर ५० किलो, गावरान तूप, व अन्य किराणामाल , भाजीपाला व खाऊ ही देण्यात आला. याप्रसंगी डंबेनाला गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब झाडगे, उपाध्यक्ष संतोष शेजवळ, सुधाकर ओतारी, संजय बारवकर, सामाजिक कार्यकर्ते, संजय कडेकर, मनसेचे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, औषध व्यवसायिक कन्हैलाल दुगड, माजी अध्यक्षा प्रिया रुणवाल, माजी नगरसेवक आबिद उर्फ मुन्ना शेख, पत्रकार प्रवीण गायकवाड,एस. टी. महामंडळ कामगार नेते माधव मुंडे, माधव सेनेचे रवींद्र सानप, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर, शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड. प्रदीप बारवकर, ॲड. सतीश गवारी, राजेंद्र शेजवळ, गणेश झाडगे, संतोष गादिया, सुभाष ओतारी, बाबाजी गलांडे, छात्रालयाच्या अधीक्षिका मीनाक्षी लंटाबळे, यश सपकाळ , उद्योजक शशिकांत कदम आदी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बारवकर म्हणाले की सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून डंवेनाला गणेश मंडळ विविध उपक्रम राबवीत असून समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयास यथाशक्ती लोकांनी मदत करावी. आगामी काळात मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी रवींद्र सानप यानी मनोगत व्यक्त केले तर प्रविण गायकवाड यांनी गीत सादर केले. स्वागत डंबेनाला गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब झाडगे यानी स्वागत केले . तर आभार माधव मुंडे यांनी मानले.