शिरूर दिनांक (वार्ताहर) शिरूर शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिरूर नगरपरिषद यांच्या वतीने ‘१ तारीख १ तास ‘या स्वच्छतेसाठीचा अभियानात एक तास श्रमदान या उपक्रमात शहरातील नगरपरिषद कर्मचारी ,अधिकारी, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, यांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी असे २ हजारहून अधिक जणांनी सहभाग घेत शहरातील २४ ठिकाणी श्रमदानातून संबधित परिसराची स्वच्छता केल्याची माहिती शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी दिली. काळे यानी सांगितले की आजच्या श्रमदानाचा मोहिमेत नगरपरिषद स्वच्छता विभाग व त्यातील कर्मचारी, इतर खात्याचे अधिकारी व कर्मचारी , महिला बचत गट, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, त्याच बरोबर शिरूर नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यासह शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी, सी.टी.बोरा कॉलेज व सीताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी, पोलीस बांधव, विविध संस्था संघटना याचे कार्यकर्ते असे २ ह्जाराहून अधिक लोक अभियानात सहभागी झाले होते. काळे यांनी सांगितले की नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की गांधी जयंती निमित्ताने दि १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत '१ तारीख १ तास श्रमदान' या अभियानात सहभागी व्हावे. शहरातील मुंबई बाजार ,शिरूर नगरपालिका शाळा क्र. ५ व ७ ,भाजी बाजार,विसर्जन घाट ,फकीर मोहल्ला, शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ लाटेआळी , सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसर , पंचायत समिती कार्यालय परिसर ,पोलिस स्टेशन कार्यालय परिसर ,तहसील कार्यालय परिसर,गोलेगाव रोड,जीवन विकास मंदिर शाळा,विद्याधाम प्रशाला ,जलसंपदा विभाग कार्यालय परिसर, शिरूर नगरपालिका शाळा क्र. ३ ,शिरूर नगरपालिका शाळा क्र. ४ व ६ ,रिक्षा स्टैंड (एस . टी स्टॅड जवळ),पोस्ट ऑफिस कार्यालय परिसर ,रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालय परिसर , प्रीतम प्रकाश नगर ,सी. टी. बोरा महाविद्यालय ,सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले . मुख्याधिकारी काळे यांनी आवाहन केले की नागरिकांनी उघडयांवर कचरा टाकू नये. नागरिकांनी घंटागाडीत कचरा देत असताना ओल्या व सुका कचरा वेगवेगळ्या करून द्यावा. चांगली स्वच्छता असेल तर साथीचे आजार प्रसार होण्याचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे आरोग्य चांगले राहून राहणीमानाचा दर्जा उंचावतो असे काळे म्हणाल्या. त्याच बरोबर स्वच्छ व हरित शिरूरसाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की आजच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत श्रमदान हे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीत करण्यात येत आहे. शिरूर नगरपरिषद हे अभियान चांगले राबवीत असून आपल्या परिसर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिरूर नगरपरिषदेच्या आजच्या मुख्य श्रमदानाच्या कार्यक्रम लाटेआळीतील घोडनदी किनारावरील शनी मंदिरालगतचा विसर्जन घाटावर झाला. यावेळी या अभियानात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे, माजी नगराध्यक्ष नसीम खान, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, वात्सल्यसिंधू संस्थेच्या उषा वाखारे, जैन युवा परिषदेचे प्रकाश चंद्रकांत बाफना यांच्यासह इक्क्बालभाई सौदागर, हुसेन शहा, शिरूर नगरपरिषद कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष द.पि.जाधव, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दतात्रेय बर्गे, पालिकेच्या वरिष्ठ अधिकारी राजश्री मोरे, आदी उपस्थित होते. यावेळी या अभियानाअंतर्गत उपस्थित नागरिकांनी स्वच्छते संदर्भातील प्रतिज्ञा केली. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी व पोलीस बांधवांनी ही शिरूर पोलीस ठाण्यात स्वच्छता मोहिमे अंतर्गत श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली. फोटो ओळी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिरूर शहरात श्रमदानातून परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .